रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – चिनावल येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये शेख ईरफान शेख कुतुबुद्दीन यांची राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा या सामाजिक संघटनेमध्ये जिल्हा संघटक म्हणुन नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जळगांव जिल्हा अध्यक्ष साहेब .डाॅ.शाकिर शेख व संघटनेचे पुर्णकालीन प्रचारक नितीनजी गाढे उपस्थित होते.
राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा संदर्भात मा.जिल्हाध्यक्ष साहेब डाॅ.शाकिर शेख सर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर भुमिका स्पष्ट केली व मा.नितीन गाढे (पुर्णकालीन प्रचारक,बामसेफ)यांनी राष्ट्रव्यापी जन आंदोलन संदर्भात मार्गदर्शन केले.
नियुक्ती समारंभात बरेचशे मुस्लीम बांधव कार्यकर्ते उपस्थित होते,जसे की मा.महम्मद तडवी,पत्रकार नजीर शेख, निसार खान, मुस्तकिम शेख मोहसीन शेख, जुबेर शेख फिरोज शेख, युसुफ शेख सईद शेख,सद्दाम शेख,ऊमर शेख अल्ताफ शेख,ऊसामा साबीर शाकिब (राजु),शाकिर खान एहसान खान व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
उत्साहपूर्ण वातावरणामध्ये राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जळगांव जिल्हा अध्यक्ष .डाॅ.शाकिर शेख यांचे हस्ते शेख ईरफान शेख कुतुबुद्दीन यांना जिल्हासंघटक म्हणुन नियुक्ती पत्रक देऊन जबाबदारी देण्यात आली व त्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात आला. नियुक्ती समारंभ कार्यक्रम हा ईरफान शेख यांचे हाॅलमध्ये चिनावल गांव, तालुका-रावेर येथे घेण्यात आला.







