मुंबई (उपसंपादक सतीश बनसोडे) – महिलेने मारहाण केलेल्या ट्रॅफिक पोलीसाला मुंबई पोलीस आयुक्तांनी दिले दहा हजार रुपयांचे बक्षीस आणि केला गौरव.
मुंबई पोलीस दलातील कार्यरत पोलीस हवालदार एकनाथ श्रीरंग पारठे, काळबादेवी वाहतूक विभाग यांना एल.टी. मार्ग येथे एक महिलेने धक्का बुक्की केली असता त्यांनी संयम बाळगला व परिस्थिती आटोक्यात आणली.
त्यांच्या प्रशंसनीय कामगिरी बद्दल पोलीस आयुक्त, मुंबई परम बीर सिंह यांनी 10,000 रुपये व प्रमाणपत्र देऊन त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार केला..







