
नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि. कुबेर जाधव) – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले यांनी नाशिक येथे सुरू असलेल्या सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेच्या चित्रीकरणस्थळी भेट दिली व राज्य सरकारने कोरोना संबंधी तयार केलेल्या नियमावलीचे पालन केले जात आहे की नाही याची पाहणी केली तसेच त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या.यावेळी नाशिक समितीचे सदस्य श्याम लोंढे, सुनील ढगे,रवी जन्नावर रवी साळवे, रमेश तलवारे,रफिक सय्यद, मिलिंद तारे,उमेश गायकवाड तसेच महेश मोटकर उपस्थित होते.








