अँटी करपशन फाउंडेशन ऑफ इंडियातर्फे पुणे दशतवाद विरोधी पथक व राष्ट्रपती पुरस्कार विजेता सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील यादव यांचा सन्मान

पुणे (प्रतिनिधी मनिष नेरुरकर) – आज दिनांक ३० ऑक्टोबर रोजी दहशतवाद विरोधी पथक पुणे चे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.सुनील यादव यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व सन्मान ,अँटी करपशन फॉउंडेशन ऑफ इंडिया,भारत या संस्थेच्या महाराष्ट्र युनिट तर्फे करण्यात आला.

 

सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.सुनील यादव हे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असून,ते अतिशय कर्तव्यदक्ष ,प्रामाणिक आणि धडाडीचे पोलीस अधिकारी आहेत.त्यांच्या पोलीस विभागातील गेली कित्येक वर्षातील त्यांच्या कामगिरी आणि जबाबदारीची नोंद भारत सरकारने राष्ट्रपती पुरस्कार देऊन घेतली आहे.यापूर्वी ते लाच लुचपत विभागात ही सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून काम पहिले आहे.सध्या ते पुणे येथे दहशतवादी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून काम पाहत आहेत.त्यांचा कामातील सचोटीपणा आणि गुन्हेगारांवर जरब ही मजबूत आहे.त्यांना त्यांच्या या अविरत सेवेसाठी हा मनाचा पुरस्कार १५ ऑगस्ट २०२० रोजी देण्यात आला.

 

त्यांना या मिळालेल्या सन्मानासाठी अँटी करपशन फॉउंडेशन ऑफ इंडिया या संस्थे तर्फे श्री.सुनील यादव साहेब यांची भेट घेऊन त्यांना संस्थे तर्फे शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आज त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी अँटी करपशन फॉउंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र युनिट चेअरमन डॉ.मिलिंद भोसुरे यांनी श्री.सुनील यादव यांचे मनपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभ संदेश दिला.यावेळेस महाराष्ट्र वाईस चेअरमन श्री मनीष नेरुरकर त्यांच्या कर्तबगारीचे कौतुक केले,इतर सदस्य श्री.पावनज्योत सिंग गांधी,राष्ट्रीय समन्वयक,श्री.नरेंद्र शर्मा,श्री.राजकुमार गोयल,आणि श्री.समीर कुमार रे हि उपस्थित होते

 

अँटी करपशन फॉउंडेशन ऑफ इंडिया भ्रष्टाचार विरोधी संघटना असून समाजात भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीचे काम करते सदर संस्था ही भारत सरकार नीती आयोग व ITA ऍक्ट अंतर्गत नोंदविलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here