राष्ट्रवादी नेत्यांकडून सादिक खाटीक यांचा सत्कार

sadik-khatic

आटपाडी (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य आटपाडीचे सादिक खाटीक यांची मौलाना आझाद विचार मंच महाराष्ट्र च्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खानापूर – आटपाडी मतदार संघाचे अध्यक्ष सुशांत देवकर (विटा)आणि मतदार संघाचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते आनंदरावबापू पाटील यांच्या हस्ते करणेत आला .

 

ईद ए मिलाद या पवित्र सणाचे औचित्य साधून राष्ट्रवादीच्या या नेतेमंडळीनी सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देवून ईदच्या शुभेच्छा दिल्याच तथापि पुष्पगुच्छ देवून निवडी बद्दल त्यांना सन्मानीत केले.sadik-khatik

 

यावेळी दलित चळवळीतील मातब्बर नेते विलासराव खरात , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अमित ऐवळे, संतोष मोटे , हणमंतराव केंगार (कौठुळी), कुर्बानहुसेन खाटीक इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here