उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशनचा मनमानी कारभाराला प्रहार जनशक्ती पक्षाचा दणका
कल्याण (आदर्श भालेराव) – 24 मे 2020 रोजी उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत घरातील कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून हेतल लुंड हिने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्यामुळे हिल लाईन पोलीस स्टेशन येते आकस्मित मृत्यू रजिस्टर क्र- ३८/२०२० crpc १७४ अन्वये दाखल करण्यात आला होता. ४० दिवस उलटून सुद्धा पोलीस गुन्हा नोंद करून घेत नव्हते आपल्या मुलीने कोटूंबिक हिंसाचाराला व पतीच्या संशय करण्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केला असताना देखील पोलीस गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करून आकस्मित मृत्यू दाखवून गुन्हा दडपविण्याचा प्रयत्न करत होते. कोरोना महामारी चा गैरफायदा घेत सदर गुन्ह्यातील आरोपीला पाठीशी घालण्याचा भयंकर प्रकार उल्हासनगर हिल लाईन पोलीस करत आहेत असा आरोप मृत महिलेच्या आई व भावाने केला होता.
पोलीस स्टेशनच्या भानगडीत पडू नका गुन्हा दाखल करू नका त्याबद्दल पाहिजे तेवढे पैसे घ्या असे मृत हेतलच्या सासरील लोकानी हेतल च्या आई ला सांगितले.
मृत्यू झालेल्या मुलीच्या आईने सदर आपल्या मुलीच्या मारेकरी विरुद्ध गुन्हा नोंद व्हावा त्यामुळे मुलीच्या आईने हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये अनेक वेळा धाव घेतली ४० दिवस उलटून सुद्धा गुन्हा नोंद करण्यास नकार
आपण आत्महत्या गुन्हा नोंद कारवा असे कळकळीची विनंती मृत मुलीच्या आईने अनेक वेळा पोलिसात केली. पोलिसांनी कोणतेही दखल घेतली नाही .माझ्या मुलीचा पोस्टमाटम जेजे रुग्णलायत करावा अशी मागणी केली मृत मुलीच्या आईने केली होती. पण तपास अधिकारी यांनी पोस्टमाटम साठी 25 हजार रुपये तुम्हाला खर्च करावा लागेल अशी भीती घालून मृत्यू मुलीच्या आई विरुद्ध कोणतेही परवानगी न घेता बळजबरी उल्हासनगर सिव्हिल रुग्णालयात पोस्टमाटम केला. मृत्य झालेल्या मुलीच्या आईने मुलीच्या सासरी लोकांना विरुद्ध गुन्हा दाखल करा म्हणून पोलिसांत धाव घेतली असता हिल लाईन पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी पोस्टमटम रिपोट आल्या शिवाय कोणताही गुन्हा दाखल होणार नाही म्हणून गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. तेव्हा मृत महिलेच्या आईने मानवी अन्याय निर्मूलन संघटना श्रमिक पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष सुवर्णा ताई कानवडे यांच्या कडे मदतीसाठी धाव घेतली सदर प्रकार हा कोटूंबिक वादातून घडला असल्याचे निदर्शनास आले असता कानवडे यांनी प्रहार जनशक्ती पक्ष ठाणे जिल्हा अध्यक्ष ऍड स्वप्नील पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले पाटील यांनी सदर प्रकरण प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका संघटक अंबादास उर्फ आदर्श भालेराव यांना दिले असता भालेराव यांनी तत्काळ सदर घटनेची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली असता सदर हेतल लुंड आत्महत्या प्रकरण मध्ये गुन्हा नोंद व्हाव्हा म्हणून मृत महिलेच्या आईंची तक्रार दिले. प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार बचू भाऊ कडू हे महिला बाळ कल्याण मंत्रालय राज्य मंत्री आहेत. जर पोलीस आरोपीस पाठीशी घालत असतील याची दखल प्रहार जनशक्ती पक्ष घेईल असे तपास अधिकारी हर्षद काळे यांच्या निदर्शनास भालेराव यांनी आणून दिले. आदर्श भालेराव यांनी पोलीस उपायुक्त शेवाळे यांच्या ही निदर्शनास आणून दिले असता तपास अधिकारी यांनी हेतल लुंड च्या घटने बाबत प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा अध्यक्ष ऍड स्वप्निल पाटील व मानवी अन्याय निर्मूलन संघटना श्रमिक पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष सुवर्णा ताई कानवडे व कल्याण तालुका संघटक आदर्श भालेराव यांच्या सतत पाठपुराव्या मूळे अखेर पोलिसांनी ४० दिवसा नंतर प्रहार च्या दणक्या मूळे गुन्हा नोंद केला.जुलै २०२० रोजी हिल लाईन पोलीस स्टेशन गुन्हे क्र ३ १८५/२०२० अन्वये भा,दं,स कलम ३०६,४९८अ अन्वये आरोपी नामे चंदन लुंड २) पूजा लुंड यांचा विरुद्ध हेतल लुंड हिला संशय करून सतत कोटूंबिक मानसिक शाररीक छळ केल्या मूळे हेतल ने पती व सासू च्या जाचाला कंटाळून राहत्या घरात आत्महत्या केल्याचा मृत महिलेच्या आईने या दोघा विरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षद काळे करत आहेत. कोटूंबिक हिंसाचार बळी पडलेल्या महिलेचा गुन्हा नोंद करण्यास पोलिसांना ४० दिवस लागतात हीच शिकांतिका आहे असे आदर्श भालेराव यांनी सांगितले.
पोलिसांना तपासाचे स्वतंत्र अधिकार कायद्याने दिलेले आहेत पण त्याचा अर्थ मनमानी आणि त्याचे लहरीप्रमाणे तपास करणे असा होत नाही अमर्यादीत निर्णय शक्ती पोलिसांना दिलेली नाही
असे न्यायालयाचे आदेश असताना देखील पोलीस गुन्हा नोंद करताना अनेक प्रकरणात पोलीस न्यायालयच्या आदेशाचे उल्लंघन करून मनमानी करत असतात. व फिर्यादी यांना आरोपी सारख वागणूक देत असतात जेव्हा पोलीस गुन्हा नोंद करण्यास ४० दिवस टाळा टाळ करून आरोपीस पाठशी घालतात तर असे तपास अधिकारी गुन्हा नोंद करून काय योग्य तपास करतील असा ही प्रश्न आदर्श भालेराव यांनी उपस्थित केला आहे. गुन्हा नोंद करताना हिल लाईन पोलिसांनी मृत महिलेच्या आईला १० तास पोलीस स्टेशन ला बसून ठेवले जाते तेव्हा पोलिसांच्या निदर्शनास आणून देखील फिर्यादी महिलेला सायंकाळी पोलीस स्टेशन मध्ये महिलेला बोलवू नये हा कायदा असताना देखील हिल लाईन पोलीस स्टेशन महिला सोबत बेजबाबदार वागतात असा ही प्रश्न जिल्हाध्यक्ष सुवर्णा ताई कानवडे यांनी केला आहे
त्यामुले कायद्याच उल्लंघन करणाऱ्या पोलीस विरुद्ध प्रहार जनशक्ती पक्ष राज्यमंत्री यांच्या कडे तक्रार करणार आहे कर्तृव्यात कसूर करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील ) नियम १९७९
१) सचोटीने न वागणे -म.ना.से ( वर्तणूक)नियम ३(१)(एक) चा भंग , २) कर्तव्य परायणता न राखणे-म.ना.से ( वर्तणूक)नियम नियम ३(१)( दोन) चा भंग नियम
३) अशोभनीय वर्तन- म.ना.से ( वर्तणूक) नियम ३(१)(तीन) चा भंग
४) प्रधान अधिकारांचा गैरवापर करणे- म.ना.से ( वर्तणूक)नियम ३(३)(एक) चा भंग प्रमाणे व फिर्याद नोंदवताना पोलिसाना विलंब का लावतात ? जर पोलीस आरोपीस पाठीशी घालत असतील तर अश्या पोलीसावर कारवाई करावी अशी मागणी ऍड स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमिक पत्रकार संघ राज्य उपाध्यक्ष आदर्श भालेराव व मानवी अन्याय निर्मूलन संघटना व प्रहार जनशक्ती पक्षा कडून केली जाणार आहे असे जिल्हा अध्यक्षा सुवर्णा ताई कानवडे यांनी सागितले
ठाणे जिल्ह्यात महिलेवर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरुद्ध प्रहार जनशक्ती कमिटी लॉक डाऊन नंतर ठाणे जिल्हा संपर्क प्रमुक हितेश जाधव, जिल्हा अध्यक्ष ऍड स्वप्नील पाटील , ठाणे सचिव सुनील शिरिषकर ठाणे ग्रामीण अध्यक्ष प्रेम प्रधान,कल्याण शहर अध्यक्ष सूर्यकांत तांबोळी,कल्याण ग्रा तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बोराडे, कल्याण तालुका सचिव प्रदीप सोनवणे, कल्याण उपशहर अध्यक्ष प्रशांत मोरे, कल्याण शहर उपाध्यक्ष संजय भोरडे, ठाणे जिल्हा कमिटी तर्फे व मानवी अन्याय निर्मूलन संघटना जिल्हा अध्यक्षतेखाली महिला संरक्षण समिती सुवर्णा ताई कानवडे, गौरी पाटील, मधू आठवले, साक्षी साळवे, कोमल धनले,राजश्री खराटे, रेखा मोरे, एकता अन्सारी राज्याचे गृहमंत्री मा अनिल देशमुख व महिला बाळ कल्याण चे राज्य मंत्री ना मा बचू कडू यांची भेट घेऊन प्रशासना मध्ये चालत असलेल्या गैरकारभार व मनमानी कारभार करणाऱ्या वर कठोर कारवाई करावी म्हणून सर्व पुरावे सहित मागणी करण्यात येणार आहे असे कल्याण तालुका संघटक आदर्श भालेराव यांनी सांगितले.







