‘भंगाळे गोल्ड’ तर्फे ऑनलाईन सोने – चांदी खरेदीची सुविधा

online-gold

महाराष्ट्रात कुठूनही सोने खरेदी करता येणार : घरपोच सुविधेचादेखील पर्याय उपलब्ध

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – सणांचा राजा असलेल्या दिपावली उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाजी विजयादशमी म्हणजे दसऱ्यापासूनच जळगावकरांनी सोने – चांदी खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. उत्सवातील या दागिने खरेदीला सुवर्णकोदण देण्यासाठी कोरोनाचे आरोग्य नियम पाळून संपूर्णतः सॅनिटाईज्ड शोरुममध्ये अनेक सुविधांसह ‘भंगाळे गोल्ड‘ सज्ज झाले असून, कोरोना कालावधीतील खरेदीसाठी ग्राहकांसाठी खास ऑनलाईन सोने – चांदी खरेदीची सुविधा ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

सद्यस्थितीतील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता ‘भंगाळे गोल्ड’ने स्वतःचे मोबाईल ॲप्लीकेशन सुरु केले असून, हे ॲप्लीकेशन गुगल ॲपवर उपलब्ध आहे. या ॲप्लीकेशनद्वारे ऑनलाईन केलेल्या सोनेखरेदीची घरपोच डिलेव्हरी देण्याची सुविधाही देण्यात आली आहे. याशिवाय २४ तासातील सोने – चांदी दरातील लाइव्ह सोने चांदी दर देण्यासोबतच, २४ तास व्यवहाराची सुविधेसोबतच कस्टमर केअर सपोर्टही उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 

विजयादशमीच्या मुहूर्तावर अनपेक्षितरित्या ग्राहकांनी प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे सोने खरेदी केली. बाजारात सध्या किरकोळ दागिन्यांना मागणी आहे. यात कानातले, अंगठी यांना मागणी असून ब्रेसलेस, बांगडी या वस्तुंना कमी मागणी आहे. बाजारात सध्या सोने खरेदीला गर्दी नसली तरी, यंदा लग्नाच्या तिथी जास्त आहेत त्यामुळे लग्नसराईत चांगली सोने खरेदी होईल
विशेषत- दिवाळीनंतर लग्नसराईचे दिवस सुरू होत असल्याने पाडव्याचा मुहूर्त साधून अनेकांनी भंगाळे गोल्डला भेट देत सोने खरेदी केली आहे. तरीही दिवाळीतील धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन व पाडव्यासाठी सोने – चांदी खरेदीला महत्व असल्याने, कोणत्याही शोरुमच्या दागिन्याच्या मोडवर घट लावण्यात येणार नसल्याचे तसेच सोने खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांना अलंकारांच्या मजूरीत आकर्षक सूट देण्यात येणार आहे. नेहमीप्रमाणे आज सोने बुक केल्यास डिलिव्हरी घेणार त्यादिवशी भाव कमी असल्यास कमी भावात किंवा भाव जास्त असल्यास बुकिंगच्या दरात सोने खरेदी करता येणार आहे.

 

नावीन्यपूर्ण दागिने

सातत्याने ग्राहकांना नावीन्यपूर्ण डिझाईन आणि दागिने देण्यासाठी प्रसिध्द असलेल्या भंगाळे गोल्डने येणार्‍या दिवाळी या सणासाठी नावीन्यपूर्ण डिझाईन्सच्या दागिन्यांची आकर्षक रेंज ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिली असून, त्यात नेकलेस, बांगड्या, अंगठ्या, पेंडलसेट, चेन, हार, कडे यांचा अगदी पाच ग्रॅमपासून ते 50 ग्रॅम वजनी दागिन्यांच्या पन्नास हजाराहून अधिक डिझाईन उपलब्ध आहेत, असे भंगाळे गोल्डचे संचालक भागवत भंगाळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here