मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – नवरात्रोत्सवात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यतर्फे मुंबई जिल्हा पश्चिम उपनगर संघटक सौ. दिशा कळंबे यांनी काही नवरात्र मंडळाला भेटी दिल्या. मालाड (पू) येथील सराफ मंदिर ट्रस्ट, राणी सती रोड; भांद्रेकर नगर चारकोप गाव, कांदिवली तरुण मित्र मंडळ नवरात्रोत्सव; चारकोप सेक्टर-२, कांदिवली गणेश मित्र मंडळ नवरात्रोत्सव तसेच हरिनगर जोगेश्वरी (पू) या ४ मंडळाना व्यसनमुक्तीबद्दल मार्गदर्शन केले. व्यसनमुक्ती संदर्भात पोस्टर प्रदर्शन केली. तसेच पत्रक वाटप केले.
कोरोना काळातील बेरोजगारीमुळे आणि घरातील मानसिक ताणतणाव मुळे काही तरुण दारू, सिगारेट, तंबाखू, ड्रग्स या व्यसनांच्या मार्गी लागत आहेत. युवा पिढीला नशेपासून दूर रहा असे आवाहन करून “व्यसने सोडा माणसे जोडा” हा संदेश दिला गेला. प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांनी स्वतः मुंबई संघटिका यांना आमंत्रित करून तरुणांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी चांगले सहकार्य केले असे दिशा कळंबे यांनी सांगितले.








