नाशिक (विशेष प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा सिडको मंडल -2, युवा मोर्चा पदाधिकारी मा तन्मय आबाजी गांगुर्डे यांच्या वतीने, लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल जयंती निमित्त यांचे स्मरण करून सिडको नाशिक मधील रिक्षा चालकांना रिक्षा कोविड सेफ्टी शिल्ड चे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाशिक युवा मोर्चा अध्यक्ष मा. मनीष जी बागुल सन्माननीय नाशिक युवा मोर्चा शहर सरचिटणीस मा.ऋषिकेश आहेर व मा निखिलेश गांगुर्डे, सिडको २ मंडल अध्यक्ष मा.श्री.अविनाशजी पाटील,वाहतूक आघाडी शहर संयोजक राजेंद्रजी फड, सरचिटणीस श्री.दिनेश जी मोडक, युवा मोर्चा अध्यक्ष वैभवजी महाले, सन्माननीय नाशिक शहर पदाधिकारी प्रसाद भाऊ ठाकरे व अनिकेत कदम जी,एचसी मोर्चा संयोजक योगेशजी मोरे, सिडको युवा मोर्चा पदाधिकारी किरणजी गाडे,आदित्यजी दोंदे,भूषणभाऊ पगार,सचिनजी गोपाल शिरोडे,दिग्विजय,रुपेश,सागर,अक्षय भाजपा पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
सरचिटणीस दिनेश जी मोडक यांनी प्रस्थावना केली, आदर पुष्पांजली युवा मोर्चा नाशिक शहर अध्यक्ष मनीष बागुल जी तथा सिडको मंडल अध्यक्ष अविनाश जी पाटील यांनी केली. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने झाला.








