कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – कर्नाटकातील मराठी भाषिक सीमा बांधवांच्या समर्थनार्थ करवीर शिवसेनेच्यावतीनेही उंचगाव येथील हायवे चौकात काळे झेंडे दाखवून,कर्नाटक सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच बेताल वक्तव्य करत सीमाबंधवांच्या जखमेवर जाणीवपूर्वक मीठ चोळणारे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचाही तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात आला.
सीमालढ्यात हुतात्म्यांना अभिवादन आणि सीमा बांधवांच्या धैर्याला सलाम करत,सीमा बांधवांच्या त्यागाला व बलिदानाला यश नक्कीच मिळेल अशी खात्री तालुकाप्रमुख राजू यादव यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी दीपक पाटील,विक्रम चोगुले,राजू सागावकर,सागर पाटील,विनायक जाधव,दिलीप सावंत,विराग करी,महेश खांडेकर,विजय शिंदे, सचिन नागटिळक,दिलीप चव्हाण,खेताजी राठोड, अजित चव्हाण,अजित पाटील,सचिन बोराटे, भरत भाटी,बंडा पाटील, शैलेश पवार,बाबुराव पाटील,बाळासाहेब नलवडे,योगेश लोहार,ओंकार राठोड आदी शिवसैनिक उपस्थित होते.







