राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या गाडीला अपघात; नाथाभाऊ सुरक्षित

eknath-khadse

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – काही दिवसांपूर्वीच भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली. अमळनेरवरून जळगावकडे येत असताना गाडीचं टायर फुटल्यानं हा अपघात झाला. सुदैवानं यात एकनाथराव खडसे यांच्यासह सर्वजण सुखरूप आहेत. त्याचबरोबर कुणालाही दुखापत झालेली नाही. नाथाभाऊंनी यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली.

 

 

nathabhau-twitterएकनाथराव खडसे हे आज (१ नोव्हेंबर) अमळनेर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते त्यांच्या (एमएच १९ सीई १९) क्रमांकाच्या कारने अमळनेर येथून जळगावकडे जात होते. धरणगावपासून ४ ते ५ किलोमीटर अंतरावर खडसेंच्या कारचा डाव्या बाजूचा पुढचा टायर अचानक फुटला. गाडीचा वेग कमी असल्यानं व चालकाने प्रसंगावधान दाखवल्यानं मोठी दुर्घटना टळली. या गाडीत एकनाथराव खडसे यांच्यासह काही कार्यकर्तेही होते. सगळे जण सुखरूप आहेत.

 

 

“आज अमळनेरहून जळगावकडे येताना धरणगाव नजिक माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडीचा वेग कमी असल्याने आणि चालकाच्या प्रसंगावधाने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही,” अशी माहिती नाथाभाऊ यांनी ट्विटरवर दिली आहे.

nathabhau-car

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here