भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी निवेदन

farmer-nivedan

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – सांगली जिल्ह्यात मागील आठवड्यापासून परतीच्या पावसाने रुद्र रूप धारण केल्याने बळीराजाला चिंतेने ग्रासले आहे. द्राक्षे , डाळिंब , ऊस , सोयाबीन , भुईमूग तसेच भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे‌. त्यामुळे बळीराजा पूर्णपणे हतबल झाला आहे.

 

शासनाने शेतकऱ्यांच्या व्यथांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी यांची मुले हॅश टॅग सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपली नाराजी व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रातील बळीराजाच्या मुलांनी सोशल मीडियावर ओला दुष्काळा सह हक्‍टरी ५० हजार रुपये द्यावेत अशी मागणी केली आहे.

 

भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र शासना बरोबर चर्चा करून शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी श्री.परशुराम नागरगोजे जिल्हा उपाध्यक्ष सांगली भाजप, यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे. यावेळी मा. दीपक बाबा शिंदे वैशाली कर सांगली शहर जिल्हाध्यक्ष भाजप, रविकांत साळुंखे कार्यकारणी सदस्य भाजप, माजी सरपंच आनंदा गडदे गुंडेवडी व भाजपच्या अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here