कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने लोकप्रिय सुमधुर हिंदी चित्रपट गीतांची “रात का समा झूमें चन्द्रमा” संगीत मैफल संपन्न

kojagiri-mafil

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बरेच दिवस घरात बसलेल्या संगीतप्रेमी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सर्व थिएटर बंद असल्याने डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन सुरेल गाण्यांची संगीत मैफल आयोजित करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे.

 

त्याच अनुषंगाने कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने निर्माती दिग्दर्शक मनाली खातू यांच्या स्वरांजली प्रेझेंटस् ” रात का समा झूमें चन्द्रमा ” या लोकप्रिय सुरेल हिंदी चित्रपट गीतांच्या मनोरंजक कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली होती.या कोजागिरी पौर्णिमा स्पेशल शो मध्ये निर्माती मनली खातू यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुमधुर, सुरेल , अविस्मरणीय लोकप्रिय गीतांची ” रात का समा झूमें चन्द्रमा ” ही सुरेल संगीत मैफल डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन आॅनलाईन सादर करण्यात आली.
निर्माती मनाली खातू यांच्या स्वरांजली प्रेझेंटस् तर्फे सादर केलेल्या अविस्मरणीय सुमधुर लोकप्रिय गाजलेल्या गाण्यांच्या ” रात का समा झूमें चन्द्रमा ” या आॅनलाईन कार्यक्रमात जावेद सुहाना, अनघा कटागडे , लेखा तोरसकर , सचिन नेरूरकर, बिंदू पार्टे, आणि मंदार जोशी या गायकांनी गाजलेली मधुर गीते सादर केली.या सुरेल संगीत मैफिलीचे सुत्रसंचलन , निवेदन आर जे सोनाली पाठक यांनी केले. या यशस्वी आॅनलाईन कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

 

विशेषतः भारतासह कॅनडा , मास्को , यूएसए , यूएई , यूके अशा जगभरातील हिंदी चित्रपट गीतांच्या चाहत्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. तसेच असंख्य रसिकांनी इव्हेंट आॅर्गनाईझर मनाली खातू यांच्या यू ट्यूब चॅनल वरून अनेकदा आनंद घेतला . या अविस्मरणीय कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशानंतर मनाली खातू यांनी स्वरांजली तर्फे डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन विविध संकल्पना घेऊन सुरेल हिंदी गाण्यांच्या मैफलीचे आयोजन करून रसिकांना घरबसल्या आनंददायी सुरेल , मधुर हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा देण्यासाठी स्वरांजली सदैव प्रयत्नशील राहील असे मनोगत व्यक्त केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here