
आडुरात यशवंत सेनेच्या दुसऱ्या शाखेचे शानदार उदघाटन
कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – धनगर समाजाच्या उन्नतीसाठी यशवंत सेनेचे पदाधिकारी त्यांच्या न्याय हक्कासाठी कटिबद्ध आहेत.असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा यशवंत सेनेचे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमूख राजेश तांबवे यांनी केले.अडूर ता.करवीर येथे यशवंत सेनेच्या दुसऱ्या शाखेचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य संघटक संजय वाघमोडे, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. संदीप हजारे, कोल्हापुर जिल्हा संघटक बापू उर्फ तम्मा शिरोले, संजय काळे, करवीर तालुका प्रमुख अनिल बनकर,करवीर तालुका उपप्रमुख संदीप वळकुंजे , शिरोळ तालुका प्रमुख अमर पुजारी, शिराळा तालुका संघटक दादा गावडे, पन्हाळा तालुका प्रमुख मारुती बंडगर, मचिंद्र बनसोडे, विकास घागरे, चंद्रकांत वळकुंजे, धुळाप्पा वळकुंजे, शाखा प्रमुख बिरू लांडगे, अडूर गावातील समस्त धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






