‘मराठी फिल्म इंडस्ट्री बचाओ आंदोलन’ला दिग्गज कलाकारांचा जाहीर पाठिंबा; मराठी सिनेसृष्टीच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार

मराठी सिनेसृष्टी

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) | मराठी चित्रपटसृष्टीसमोरील विविध गंभीर समस्या आणि कलाकारांच्या न्याय्य हक्कांसाठी उभारण्यात आलेल्या ‘मराठी फिल्म इंडस्ट्री बचाओ आंदोलन’ या अभियानाला मराठी सिनेसृष्टीतील नामवंत आणि दिग्गज कलाकारांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत (फिल्म सिटी) पार पडलेल्या सुवर्ण महोत्सवी शुभारंभ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाने आक्रमक पवित्रा घेत सिनेसृष्टीचे लक्ष वेधून घेतले.

महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वर्धापन दिनानिमित्त ‘सुवर्ण महोत्सवी शुभारंभ’ सोहळा १ ऑक्टोबर रोजी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील स्टुडिओ क्रमांक ०१ मध्ये उत्साहात पार पडला. या शासकीय सोहळ्याच्या वेळेसच ‘मराठी फिल्म इंडस्ट्री बचाओ आंदोलना’च्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मराठी सिनेसृष्टीच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आणला.
ज्येष्ठ कलाकारांची खंबीर साथ
मराठी चित्रपटसृष्टीच्या अस्तित्वासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला सिनेसृष्टीतील ज्येष्ठ व लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांनी पाठबळ दिले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते महेश कोठारे, लोकप्रिय अभिनेते विजय पाटकर, जयंत वाडकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री सविताताई मालपेकर यांनी या आंदोलनाला आपला मोलाचा व जाहीर पाठिंबा दर्शवला. दिग्गज कलाकारांच्या या पाठिंब्यामुळे आंदोलनाला मोठी ताकद मिळाली आहे.
हक्कासाठी लढा आणखी तीव्र करणार : प्रसाद इंगवले
मराठी चित्रपट, तंत्रज्ञ आणि कलाकारांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी हे आंदोलन सुरू झाले असून, मराठी भाषेतील कलाकृतींना योग्य वाव आणि न्याय मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा ठाम निर्धार आंदोलनाचे अध्यक्ष प्रसाद इंगवले यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी आंदोलनाचे उपाध्यक्ष हर्षल भिसे पाटील, कार्याध्यक्ष सचिन पिंपरीकर, सतीश आंबर्डेकर, सागर खडके, अक्षय क्षीरसागर, श्रीकांत उमरीकर, अमोल निरगुडे, उमेश पंडित, संकेत राऊत, डॉ. भगवान कांबळे, सुनील जाधव, संकेत शिर्के, सुधीर शहाजी उमाप, परते पुष्पा, जान्हवी धिंदळे, रामचंद्र शिवराम साळुंखे, जगदीश चव्हाण, प्रशांत बोगम, स्वप्नील कापसे, मनोज हरिश्चंद्र थोरात, गणेश तळेकर, जितेंद्र वाईकर, रवी भोंगाडे, शामराव पवार, राजू माने, अजय गोपीवार, मनोहर आग्राडे, सीमा अहिरे, भगवान आत्राम, जोसेफ अमोलिक, ज्वाईसी अमोलिक, वैशाली अमोलिक, कृष्णांत खरे, संकेत बने, स्वरा चव्हाण, विजय गायकवाड, धनंजय जाधव, भरत गांगुर्डे, योगेश पंडित, अशोक ढवळे, आशिष देशपांडे आणि समीक्षा गिसरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here