पुण्यात गड किल्यांवरील ट्रेकिंगला प्रशासनाची परवानगी – उमेश झिरपे

treking

पुणे (प्रतिनिधी अविनाश मुंढे) – कोविड १९च्या पाश्र्वभूमीवर संपुर्ण देशात लॉकडाऊन करण्यात होते.कोविडचे प्रमाण कमी होत असल्याने सरकारने एका एका क्षेत्राला परवानगी देण्यास सुरुवात केली आहे गेल्या आठ महीन्यांपासून बंद असलेल्या गिर्यारोहणाला ही परवानगी मिळाली असून जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश काढले आहे
महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ संस्थेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले होते.या निवेदनामध्ये गिर्यारोहण व इतर साहसी खेळांच्या वृध्दीसाठी अविरतपणे काम करणारी संस्था आहे ज्या प्रमाणे धरण परिसरात पर्यटन निर्बंध हटविण्यासंदर्भात प्रशासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत त्याचप्रमाणे पुणे जिल्यातील गड किल्यांवर कातळड्यांवर गिर्यारोहण ,ट्रैकिंग करण्यासंबंधी प्रशासनाची परवानगी प्रकाशित केल्यास साहसवीरांना हुरुप येईल गिर्यारोहण व साहसाची माहेरघर पुन्हा एकदा खुलेल अशी विनंती करण्यात आली होती.

 

 

या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी गड किल्ल्यावरील ट्रेकिंगला परवानगी दिली आहे.परंतु ही परवानगी देताना काही नियम घालून देण्यात आले आहेत त्यामध्ये कोविड संपर्काच्या पाश्र्वभूमीवर मर्यादित स्वरुपात पुणे जिल्ह्यतील गड किल्यांवर, कातळकड्यांवर गिर्यारोहण, ट्रेकिंग साठी जाताना एका ग्रुप मध्ये १५ पेक्षा जास्त सदस्य नसावेत तसेच ट्रेकिंगसीठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे थर्मल स्क्रिनिंग करणेत यावे ,अधिक संख्या असल्यास वेगवेगळे ग्रुप करुन वेळेमध्ये फरक ठेवावा, ट्रेकिंगसाठी प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक राहील,सहभागी व्यक्तींनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंञालयाने जाहिर केलेल्या सूचनांनुसार योग्य ते शारिरिक अंतर राखणेबाबतचा नियम काटेकोरपणे पाळणेत यावा,दहा वर्षाच आतील पासष्ट वर्षावरील व्यक्तींना सहभाग देऊ नये ताप,सर्दी,खोकला इत्तर कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तीला सहभाग देऊ नये स्थानिकांच्या घरात भोजन मुक्काम इत्तर करु नये एकमेकांच्या वस्तू हाताळू नयेत आदि सुचना देण्यात आल्या असून या सूचनांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलेला आहे.gad-killa

 

गिर्यारोहण क्षेञासाठी ही चांगली बातमी आहे. सध्याचा काळ हा गिर्यारेहणासाठी अनुकुल असतो.सह्याद्रीमध्ये भटंकतीसाठी जाताना आपण दुर्गम भागातून जात असतो तेथे असलेल्या नागरिकांना या केविडचा कोणताही प्रकारचा संसर्ग होऊ नये याची दक्षता प्रत्येक साहस प्रेमींनी घेणे गरजेच आहे. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करित गिर्यारोहणाचा आनंद घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष-अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण उमेश झिरपे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here