शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ५ ही डॉक्टरांचे निलंबन मागे घ्या; मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांना मानियार बिरदारीचे साकडे

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – शहर व परिसरात कोरोना हा आजार वाढत असून मृत्यूचे प्रमाण सुद्धा वाढत असताना मनुष्य बळाचा अभाव दिसून येत आहे अशा वेळी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील पाच डॉक्टर जे निलंबित केले आहे त्यांचे निलंबन त्वरित रद्द करून कामावर घ्यावे अशी मागणी मानियार बिरदारीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी मा मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांना इ मेल द्वारे केली आहे
शासकीय महाविद्यालयातून डॉ भास्कर खैरे, डॉ सुयोग चौधरी, डॉ कल्पना धनकराव, डॉ किरण पाटील, डॉ आसिफ शेख या पाच डॉक्टरांचे निलंबन करण्यात आले होते. महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ नियम ४१ अन्वये शासकीय कर्मचाऱ्याला निलंबित करता येते परंतु कोणत्या कर्मचाऱ्याला निलंबित करावे याबाबत सुद्धा या नियमावलीत स्पष्टपणे नमूद आहे 1991मधील प्रकरण-2 मध्ये निलंबनाला संदर्भात ज्या तरतुदी आहेत त्यातील एकही तरतूद या पाचही डॉक्टरांना लागू होत नाही उलट यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गंभीर स्वरूपाचे आरोप नसून ते सेवेत राहिल्यास जनक्षोभ निर्माण होणार नाही किंवा कोणतेही अडचण येणार नाही त्यामुळे आज जळगावकरांना व खास करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांची कमतरता असताना या पाचही डॉक्टरांची विभागीय चौकशी सुरू करून त्यांना सेवेत घ्यावे म्हणजे अनुभवी डॉक्टरांचा फायदा रुग्ण सोबत सरकारला सुद्धा होईल तरी या पाच डॉक्टरांची निलंबन आदेश रद्द करून त्यांना सेवेत सामावून घ्यावे अशी एक मुखी मागणी मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्या कडे करण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here