चीनमध्ये कोरोनानंतर आता पुराचं थैमान

बिजिंग – कोरोना व्हायरसच्या दहशतीतून येथील लोक पूर्णपणे बाहेरही पडलेले नव्हते. तोच पावसाने येथील परिस्थिती अणखीनच भयावह केली आहे. चीनमध्ये झालेल्या पावसाने आतापर्यंत तब्बल 106 जणांचा बळी घेतल्याचे वृत्त आहे. चीनच्या यिचांग शहरात पावसामुळे घाणेरडे पाणी लोकांच्या कमरेपर्यंत आले होते.
येथे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने लोकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणावर गाड्यादेखील या पाण्यात अडकल्या आहेत. रस्त्यांना अक्षरशः नाल्याचे स्वरूप आले आहे. चीनमधील पर्यटकांचे सर्वात आवडते असलेले शहर यंगशुओमध्ये ढगफुटी झाली आहे. या पावसामुळे दक्षिण चीनमध्ये मोठे नुकसान झाले आहे.
येथे कोसळणाऱ्या पावसाचा सर्वधिक फटका हुबेई प्रांताला बसला आहे. यापूर्वी येथे कोरोना व्हायरसने थैमान घातले होते. आता या प्रांताला पावसाच्या प्रकोपाला सामोरे जावे लागत आहे. येथे एवढे पाणी साचले आहे, की लोकांना आपले घर-दार सोडून सुरक्षित स्थळी जावे लागत आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनचा हा प्रांत बरेच दिवस बंद होता. आता काही दिवसांपासून येथील वातावरण पूर्व पदावर येत असतानाच पावसाने कहर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here