आज जळगाव जिल्ह्यात १६९ कोरोनाबाधित आढळले

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब तपासणी आज (दि.४) प्राप्त झालेल्या अहवालामध्ये जिल्ह्यातील १६९ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
१६९ पॉझिटिव्ह व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ५७, जळगाव ग्रामीण १२, भुसावळ ९, अमळनेर १८, चोपडा ४, पाचोरा १, भडगाव ३, धरणगाव ३, यावल ८, एरंडोल १४, जामनेर १४, रावेर ५, पारोळा २, चाळीसगाव २, मुक्ताईनगर १, बोदवड १६ असा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४१७६ झाली आहे. आज अखेर बरे झालेले रुग्ण २४७६ असून, त्यात आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४१ आहे.उपचार सुरु असलेल्या कोरोना बाधितांमध्ये २१६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here