माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हासजी नरड यांना हृदय निरोप समारंभ

maharashtra-shikshak-parishad

वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हासजी नरड यांची बदली. चंद्रपूर(माध्यमिक) येथे झाली. त्यानिमित्त वर्धा येथील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून त्यांना हृदय निरोप देण्यात आला.

 

या निरोप समारंभात उल्हास नरड यांनी जिल्ह्यामध्ये कमी कालावधीत चांगले काम केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद वर्धा जिल्ह्याच्यावतीने सपत्निक शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. व त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

या समारंभास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अजय वानखडे – सहकार्यवाह नागपूर विभाग, प्रवीण भोयर अध्यक्ष वर्धा जिल्हा, सुरेश रोठे कार्यवाह वर्धा जिल्हा, चंदू ठाकरे उपाध्यक्ष वर्धा जिल्हा, मनिषा ताई साळवे महिला आघाडी वर्धा जिल्हा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here