महागाईमुळे दिवाळी फराळ होणार महाग

diwali-faral

खाद्यतेल, तुपासह बेसन, रव्याच्या किमतीत वाढ; तयार फराळाचे दरही वाढण्याची चिन्हे

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – करोनाच्या सावटाखाली येत असलेल्या दिवाळसणात फटाके, आप्तेष्टांच्या भेटीगाठी या गोष्टींना मुरड घालावी लागणार असली तरी खुसखुशीत फराळाच्या चवीद्वारे सण साजरा करण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र, सर्वसामान्यांच्या या अपेक्षेवर महागाईमुळे पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. दिवाळी फराळासाठी वापरण्यात येणाऱ्या जिन्नसांसह खाद्यतेल, तूप, डालडा यांच्या किमतीतही वाढ झाल्याने यंदाचा फराळ महागण्याची शक्यता आहे.

 

 

दिवाळीच्या तोंडावर फराळासाठी लागणाऱ्या जिन्नसांच्या किमतीत हमखास वाढ होते. यंदा करोनामुळे एकूणच बाजारात मंदीचे वातावरण असल्याने या जिन्नसांच्या दरांत फारशी वाढ न होण्याची शक्यता होती. मात्र, गेल्या वर्षीपेक्षा खाद्यतेल, तूप आणि डालडा यांच्या किमतीत १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे.

 

गेल्या वर्षी प्रति किलो ४६० रुपयाला मिळणारे तूप आता ५०० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. ११० रुपये प्रति लिटर मिळणारे खाद्यतेल १३० रुपयांवर गेले आहे. त्याचबरोबर डालडाच्या दरात २० रुपयांनी वाढ झाली आहे. जाड तसेच पातळ पोह्य़ांच्या किमतीत ४ ते ५ रुपयांनी वाढ झाली आहे. बेसनच्या दरातही किलोमागे १५ रुपयांची वाढ झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी ८१ रुपये किलोने विकले जाणारे बेसन ९६ रुपयांनी विकले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here