अपर जिल्हाधिकारी प्रविण पाटील यांचा जनमत प्रतिष्ठानकडून सन्मान

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – कोरोना व्हायरसने शहरात थैमान घातले असताना, नागरिकांच्या सुरक्षेसाठी नियोजन करताना अहोरात्र काम करणाऱ्या शासकीय अधिकारी, पोलीस व डॉक्टरांचा जनमत प्रतिष्ठानकडून सन्मान करण्यात येत आहे.
आज जनमत प्रतिष्ठान कडून अपर जिल्हाधिकारी प्रवीण पाटील यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. आगामी ७ जुलै ते १३ जुलै दरम्यान होणाऱ्या लॉकडाउन काळामध्ये प्रशासनाला काय मदत करता येईल याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण पाटील यांच्यासह जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले , अभियंता सचिन सैंदाणे, शिक्षक महिला भारती अध्यक्ष शितल ताई जडे ,हर्षाली पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here