नेरुळ प्रभाग ९६ मध्ये दिपावलीनिमित्त भगत परिवाराने दिल्या घरोघरी जावून शुभेच्छा

nerul

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – दिपावली अवघ्या पाच-सहा दिवसावर आलेली असताना नेरूळ प्रभाग ९६ मध्ये माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेश भगत यांनी प्रभागामध्ये घरोघरी जावून शुभेच्छा देण्यास सुरूवात केली आहे. नेरूळमधील अन्य राजकारणी उटणे बनविण्यात व्यस्त नेरूळ नोडमध्ये भगत परिवाराने दिवाळीच्या शुभेच्छा घरटी दिल्यामुळे त्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.

 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जावून शुभेच्छा देताना माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेश भगत यांनी साखर, रवा आणि सुंगधी उटणे दिपावली भेट दिली आहे. घरोघरी जावून दिपावलीच्या शुभेच्छा देताना रहीवाशांची आस्थेवाईक चौकशी करत भगत परिवाराने एकप्रकारे सुसंवाद अभियान सुरू केले असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.nerul-diwali

 

दिपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी रहीवाशांना भेटी देताना माजी नगरसेविका सौ. रूपाली भगत व जनसेवक गणेश भगत यांच्यासमवेत रमेश नार्वेकर, गोरक्षनाथ गांडाल,विकास तिकोणे, सागर मोहीते,अशोक गांडाळ, राजेंद्र तुरे,रविंद्र भगत आदी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here