वाढदिवसाचा आनंद दिव्यांग मुलांसोबत साजरा करणारा पोलिसांतील माणूस एपीआय मयुर भामरे

mayur-bhamre

मुंबई (संपादक सुनिल पाटील) – आजकाल वाढदिवस म्हटला म्हणजे घरात जल्लोष, पार्टी असे वातावरण असते. मात्र आपण ज्या समाजात जगतो त्या समाजाचे भान ठेवून जगणारे फार कमी असतात. असाच एक मनात माणुसकी व प्रेमाचा झरा जपणारा पोलिसातील माणूस एपीआय मयुर साहेबराव भामरे यांनी आपला वाढदिवस दिव्यांग मुलांसोबत साजरा करुन एक वेगळा प्रघात पाडला आहे.

 

याविषयी बोलताना एपीआय मयुर भामरे यांनी आपल्या सोशल मिडीयावरील पोष्टमध्ये म्हटले आहे की, आपल्याच मोबाइलमध्ये आपलेच विश्व बनवलेले आपण, दुसऱ्यांच्या आयुष्यात फक्त चार्जेर पुरते लक्ष घालतो हेही तितकेच खरे. पण यावेळेस केक वा पार्टीवर पैसे खर्च करण्यापेक्षा दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर निखळ हसू फुलवावं ही इच्छा मनात आली. शहरातील दिव्यांग मुलांचा शाळांचा शोध घेतला, एक दिव्यदृष्टी शाळा व एक विशेष शाळा मिळाली, त्यातही दुर्दैव असं, माझ्यासह अनेकांना ही शाळा शहरात आहे, याचीच भ्रांत नव्हती. मित्र व सहकारी मंडळींचा साथीने आधी दिव्यदृष्टि शाळेत पोहोचलो, विद्यार्थी पावले मोजत बरोबर आपापल्या जागेवर जेवायला येऊन बसली, सुरेल प्रार्थना झाली, आम्ही जेवण वाढले. मुले बघू शकत नव्हती , पण हात हातात घेऊन हसत होती, कितीही पैसे भरले तरी न मिळणारा आनंद आम्हांस लाभत होता. ऊर भरून आला होता. समाधानाने त्यांना खाऊ घातले. मुले जेवून उठल्यावर बाहेर रांगेत बसली. त्यांना नॅपकिन व हॅन्ड वॉश चे वाटप केले. मुले आनंदात होती आणि आम्ही स्वर्गसुखात.mayur-bhamre-api

 

 

त्यानंतर,पाऊले विशेष शाळेकडे वळली. मुले जेवणाचा ताटावर मांडी घालून सज्ज होती, शब्द त्यांचा ओठात नाही तर डोळ्यात देवाने कैद केले होते. डोळ्यांनीच खाणाखुणा झाल्या. त्यांनी हाथ हवेत उंचावून आमचे स्वागत केले. विना शब्दांचा भावना पोहोचल्या, त्यांना ही व आम्हांला ही. त्यांचा डोळ्यात आनंद ओसंडून वाहत होता, तेथील शिक्षकांच्या आग्रहाखातर मी मुद्दाम युनिफॉर्म घालून पोहोचलो होतो. त्या मुलांचा आनंद द्विगुणित झाला होता अन माझा पण. विलक्षण प्रेमाने मुले आमच्याकडे पाहत होती, पूर्वाश्रमीची ओळख असावी बहुधा। हातांनीच संवाद साधले गेले. त्यानंतर त्यांनाही नॅपकिन व हॅण्डवॉश वाटप करण्यात आले। मुलांचा सेल्फी घ्यायचा उत्साह, स्वतःला सेलिब्रेटी झाल्याचा आभास निर्माण करत होता। पैशाने जग विकत घेता येत असेलहि, पण शुद्ध आनंद माणूसकीतून मिळतो, हे चटकन लक्षात आले.त्यांचा गोड चेहऱ्यांवर हाथ फिरवून,मला दिलेल्या सुखाची जाणीव त्यांना करून दिली। तेही सुखावले, त्यात खाकीची भर होतीच। मन कृतकृत्य झालं, वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा झाला म्हणून.api-mayur-bhamre

 

दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणाऱ्या इतरांपेक्षा वेगळा विचार करणाऱ्या पोलिसातील माणसाला बुलंद पोलिस टाइम्सचा सलाम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here