‘आपला जिल्हा -आपले उपक्रम’ डिजिटल बुकच्या भाग चारचे विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या हस्ते होणार प्रकाशन

aapala-jilha-aapala-upkram
  • जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम
  • 10 नोव्हेंबर रोजी नाशिक येथे होणार प्रकाशन

जळगांव (संपादक सुनिल पाटील) – जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील व प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला जिल्हा आपले उपक्रम हे ई-पुस्तक तयार करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम लॉक डाऊन च्या काळात राबविण्यात आला होता .

 

हे ई -पुस्तक तयार करण्याची संकल्पना पाचोरा तालुक्याच्या राजुरी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अरुणा मुकुंदराव उदावंत व शहापुरा शाळेचे उपशिक्षक पंकज पालीवाल यांनी मांडली. प्राथमिक शिक्षण विभागामार्फत आयटी सेल ची निर्मिती करण्यात आली असून या अंतर्गत इ – बुक संपादनाची जबाबदारी प्रभारी उपशिक्षणाधिकारी विजय शांतीलाल पवार यांनी सांभाळली व त्यांना संभाजी हावडे उपशिक्षक जि .प.शाळा पाळधी तालुका जामनेर यांनी सहकार्य केले .उपक्रमासाठी पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील, उपाध्यक्ष लालचन्द भाऊ पाटील तसेच शिक्षण सभापती रवींद्र भाऊ पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील , डायट प्राचार्य अनिल झोपे, माध्यमिक शिक्षणाधिकारी बी जे पाटील ,निरंतर शिक्षणाधिकारी के ए पाटील यांचे शुभेच्छा संदेश प्राप्त झाले आहेत.

 

या पुस्तकाचे तीन भाग यापूर्वी प्रकाशित झाला असून शिक्षकांनी याचे उत्स्फूर्त स्वागत केले होते. आपला जिल्हा आपले उपक्रम भाग चार हे ई पुस्तक प्रकाशनासाठी तयार असून 10 नोव्हेंबर रोजी नाशिक येथे विभागीय शिक्षण उपसंचालक श्री नितीन उपासनी यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. अंतिम भाग चार या पुस्तकातही शिक्षकांचे अभिनव उपक्रम समाविष्ट केलेले असून त्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने जिल्ह्यातील शिक्षकांकडून लॉकडाउनच्या कालावधीचा उत्कृष्टरित्या उपयोग करून घेतला व लेखन कौशल्य प्रोत्साहन दिले. खूप मोठा प्रतिसाद या उपक्रमाला मिळालेला आहे. डिजिटल बुक भाग चार पुस्तकाच्या निर्मिती साठी राजेंद्र कोळी ,श्रीमती सोनाली साळुंखे, रत्नाकर पाटील, श्रीमती विजया पाटील ,श्रीमती कल्पना पाटील , संदीप पवार , राहुल चौधरी , सुनील दाभाडे, मनोहर तेजवानी, अरुण पाटील, विलास निकम,प्रभात तडवी, ईश्वर महाजन इत्यादी शिक्षकांनी सहकार्य केले.

 

तसेच उपशिक्षणाधिकारी सतीश चौधरी, राजेंद्र सपकाळे, विस्तार अधिकारी सरला पाटील, जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख या सर्वांचे अनमोल सहकार्य मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here