मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – पदोन्नती कोणतीही असो ती मनापासून आनंद देऊन जाते आणि नव्या जबाबदारीची जाणीव करून देते. दिनांक 8 नोव्हेंबरला विलेपार्ले पोलीस स्टेशनचे एएसआय म्हणून सुरेश डाळे यांची पदोन्नती झाली.
एएसआय सुरेश डाळे याच्या खांद्यावर पदोन्नतीचे स्टार विलेपार्ले पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलका मांडवे यांनी लावले. यावेळी बोलताना सुरेश डाळे म्हणाले की, खांद्यावरल्या या एका स्टारच्या वाढण्यासोबत जबाबदारीही वाढली असून, ती प्रामाणिकपणे पाळण्याचा मी निश्चितच प्रयत्न करीन.
सुरेश डाळे यांची एएसआयपदी पदोन्नती झाल्याबद्दल बुलंद पोलीस टाइम्स परिवारातर्फे तसेच परिसरातील नागरिकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.







