धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – सामाजिक न्याय विभाग मंत्रालय मुंबई ,दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे ,जिल्हा समाज कल्याण विभाग, जि.प.अंतर्गत पंचायत समिती धरणगाव येथे दिव्यांग हक्क अटी नियम कायदा 2016 कलम 25 अन्वय दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन कक्षाचे उद्घाटन गुलाबरावजी वाघ यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले
या कार्यक्रमास दिव्यांगांना स्वावलंबन(UDID) कार्डाचे वाटप करण्यात आले. तसेच दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना मा.भरत चौधरी (वै.सा.का.)यांनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सन्माननीय पी.एम.पाटील सर ( उपजिल्हा प्रमुख शिवसेना), जि.प.सदस्य.गुलाबभाऊ चौधरी, मुकूंद नन्नवरे (सभापती) ,मा.प्रेमराज पाटील,मा.आसाराम कोळी,मा.अनिल पाटील,मा.संजय धनगर साहेब (बि.डि.ओ.)मा.चौधरी साहेब , अशोक बिऱ्हाडे साहेब,(गट शिक्षणाधिकरी), मा.बेडसे साहेब,धर्मॆद्र सुर्यवंशी,मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वाल्मिक पाटील सर व मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ऋषिकेश जाधव सर श्री.राहुल पाटील (वि.शिक्षक जळगांव)तसेच दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन कक्षाचे परिचर मा. किशोर पाटील सर,आर.एच.पाटील, नंदु पाटील, संतोष भडांगे,चंदु पाटील,अनंत जाधव, दिलिप पाटील, उमेश पाटील, सर्व पंचायत समितीचे कर्मचारी वृंद उपस्थित होते
दिव्यांग मार्गदर्शन कक्षात कलाशिक्षक किशोर पाटील यांची कक्षपरिचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली.








