देशात पुन्हा कोरोना रुग्ण वाढीस सुरुवात

corona-patient

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – देशात मागील २४ तासात कोरोनाचे ४५ हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. गेले दोन दिवस सातत्याने ४५ हजारांहून अधिक रुग्ण सापडत असल्याने प्रशासनाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. गेल्या २४ तासात देशात ४५,९०३ नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच गेल्या २४ तासात देशात ४९० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशात आता सध्या ५ लाख ०९ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.



आतापर्यंत देशात एकूण १ लाख २६ हजाराहून अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा ८५ लाखांच्या देखील पुढे गेलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात एकूण ८५,५३,६५७ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी १,२६,६११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 


देशात आतापर्यंत ७९,१७,३७३ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या ५,०९,६७३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here