वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – औरंगाबाद जिल्ह्यातील एमआयडीसी परिसर चिखलठाणा येथील एका वृत्तपत्रात एका संपादकाने 8नोव्हेंबर 2020 रोजी “मास्तर जरा जास्त काम केले तर मराल काय “या सदराखाली शिक्षकांप्रती कुहेतूने व द्वेष भावनेने फक्त आणि फक्त प्रसिद्धीकरता शिक्षकाविषयी अपमानकारक भाषेचा अवलंब करून शिक्षकांची जनसामान्यांमध्ये प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करून शिक्षकांच्या भावना दुखावल्या. त्यामुळे राज्यातील शिक्षकां मध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली म्हणून आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ,तक्रार निवारण समितीच्यावतीने अजय भोयर यांचे नेतृत्वात शिक्षणाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन पाठवून संबंधित वर्तमानपत्र व त्यांचे संपादक यांच्यावर कारवाईची मागणी केली.
तसेच आज जिल्हा परिषद वर्धा समोर निदर्शने करून संपादकाच्या प्रतिमेला काळे फासून निषेध करण्यात आला.फक्त माफीनामा नको तात्काळ कारवाई हवी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी म.रा.शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीचे कुंडलिक राठोड, पुंडलिक नागतोडे, संजय बारी, राजू कारवटकर, प्रशांत चौधरी, मिलिंद महल्ले, धिरज समर्थ, संतोष महाजन, अविनाश धात्रक, राजेंद्र वसु, नरेंद्र गोखले, दत्ता राऊळकर, संदीप चांभारे, अनंता पोराटे, हेमंत डोर्लीकर, मनोज बाचले, संजय हटवार, शिवशंकर चंदीवाले, राजेंद्र देशमुख, पराग वाघ, प्रदीप गुल्हाने, उत्तम नन्होरे,. मंगेश धुर्वॅ, एन एम वनसिंगे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते







