जिल्हा परिषद जळगाव चा डिजिटल बुक उपक्रम नाशिक विभागात राबवणार – शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी

jalgaon-education-department

आपला जिल्हा -आपले उपक्रम डिजिटल बुकच्या भाग चारचे प्रकाशन नाशिक येथे प्रकाशन संपन्न

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – आपला जिल्हा आपले उपक्रम भाग चार या डिजिटल बुक चे नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या दालनात विभागीय परीक्षा मंडळ कार्यालय नाशिक येथे प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी कोरोना काळात विविध शैक्षणिक उपक्रम तसेच या ई -पुस्तकातील उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचे व शिक्षण विभागाचे अभिनंदन करत हा उपक्रम नाशिक विभागात राबवणार असे प्रतिपादन मार्गदर्शनपर भाषणात शिक्षण उप संचालक नितीन उपासनी यांनी केले.

 

 

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला जिल्हा आपले उपक्रम हे ई-पुस्तक तयार करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम लॉक डाऊन च्या काळात राबविण्यात आला होता .या पुस्तक प्रकाशन प्रसंगी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी जळगाव भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी नाशिक श्रीमती वैशाली झनकर, शिक्षणाधिकारी नाशिक प्रवीण पाटील, शिक्षणाधिकारी नंदुरबार एम व्ही कदम, प्रभारी उपशिक्षणाधिकारी जळगाव विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी एजाज शेख, शिक्षण विस्तार अधिकारी गणेश शिवदे, सौ कल्पना पाटील, श्रीमती अरुणा उदावंत, पंकज पालीवाल, श्रीमती सोनाली साळुंखे, राहुल चौधरी, सुनील दाभाडे, प्रभात तडवी, विलास निकम, मनोहर तेजवाणी, राम महाजन, रत्नाकर पाटील, राजेंद्र कोळी इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सूत्र संचलन श्रीमती अरुणा उदावंत यांनी केले. आभार प्रदर्शन विजय पवार यांनी केले.श्रीमती सोनाली साळुंखे, राहुल चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. इ -पुस्तक संकल्पना श्रीमती अरुणा उदावंत व पंकज पालीवाल यांची होती.

 

या उपक्रमासाठी पालक मंत्री ना. गुलाबरावजी पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रंजनाताई पाटील, उपाध्यक्ष लालचन्द भाऊ पाटील तसेच शिक्षण सभापती रवींद्र भाऊ पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्री बी.एन. पाटील , डायट प्राचार्य अनिल झोपे , माध्यमिक शिक्षणाधिकारी बी जे पाटील ,निरंतर शिक्षणाधिकारी के ए पाटील यांचे शुभेच्छा संदेश प्राप्त झाले आहेत. भाग चार पुस्तकात शिक्षकांचे अभिनव उपक्रम समाविष्ट केलेले असून त्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने जिल्ह्यातील शिक्षकांकडून लॉकडाउनच्या कालावधीचा उत्कृष्टरित्या उपयोग करून घेतला व लेखन कौशल्य प्रोत्साहन दिले. खूप मोठा प्रतिसाद या उपक्रमाला मिळालेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here