आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी
पारोळा (प्रतिनिधी) – टोळी ता.पारोळा येथील २० वर्षिय तरुणीवर तीन नराधमांनी गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर तिला विष पाजून घातपात केल्याचे समोर आले आहे.या दुर्दैवी घटनेचा शहर भाजपा तर्फे जाहीर निषेध करण्यात आला.ही घटना अतिशय हृदयद्रावक असून मनाला चटका देणारी आहे .
या घटनेतील नराधमांना त्वरित अटक होऊन मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी व तरुणीला न्याय द्यावा.अशा घटना घडणे म्हणजे विकृत,क्रूर मानसिकतेवर कायद्याची वचक नाही असे दिसते.म्हणून अशा नराधमांना लवकरात लवकर कठोर कारवाई करत फाशीची शिक्षा देण्यात यावी असे निवेदन नायब तहसीलदार योगेश पवार यांना देण्यात आले…
यावेळी शहराध्यक्ष उमेश वाल्हे, उपाध्यक्ष महेंद्र महाजन,चंद्रकांत कंखरे,ऍड रमाकांत महाजन,तुळशीराम हटकर, शितल देशमुख, मुन्ना कोळी,पंकज भोई,समाधान पाटील,चेतन चौधरी, सागर शेटे, उपस्थित होते.







