जळगाव (संपादक सुनिल पाटील) – श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान व जनमत प्रतिष्ठान माध्यमातून दिवाळी निमित्त हरी विठ्ठल भागात 2दिवसांचे रांगोळी व मेकअप सेमिनार घेण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे श्रीमंत शिवतेजचे अध्यक्ष दीपक भाऊ दाभाडे , जनमत अध्यक्ष चे पंकज नाले,तसेच स्मार्ट लूक चे अर्चना देसले व अखिल भारतीय शाहू महिला ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष हर्षाली पाटील यांनी मार्ग दर्शन केले.
भविष्यात स्वयंरोजगार कसा उपलब्ध होऊ शकतो याविषयी माहिती देण्यासोबत वर्तमानातील तसेच भविष्यातील आर्थिक सक्षमतेची संधी कशी मिळू शकते याबाबत सहभागी मुलींना माहिती देण्यात आली









