भुसावळ (विशेष प्रतिनिधी) – कुऱ्हा पानाचे येथील बुलंद पोलीस टाइम्स चे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते गिरीश संजय पवार यांची आदर्श ग्रामविकास फाउंडेशन पुणे मार्फत भुसावळ तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
आदर्श ग्रामविकास फाउंडेशन ही सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक प्रतिष्ठीत संस्था असून, या संस्थेमार्फत तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाचा प्रसार करणे, वैद्यकिय शिबिर व मार्गदर्शनाच्या माध्यमातून आरोग्य विषयक कार्याबाबत माहिती देणे, महिलांना आर्थिक सबलीकरणासाठी मार्गदर्शन करणे, ग्रामपातळीवर पर्यावरण , क्रीडा , कला यासाठी महिलांना प्रशिक्षण देणे, ग्रामपातळीवर व्यवसाय, आंगणवाड़ी, बालवाड़ी , पाळनाघर , प्राथमिक शाळा याबाबतचे प्रशिक्षण देणे, ग्रामपातळीवर शासकीय योजनांची माहिती देणे आदी कार्य केले जाते.
गिरीश पवार यांच्या निवडीबद्दल भुसावळ शहर व परिसरातून त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.








