नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी कोरोना विषाणू साथीचा आजार पार्श्वभूमीवर जीवाची पर्वा न करता व कुटूंबाची काळजी न करता काम केले आहे.
कोरोना काळामध्ये पालिकेतील कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण होता. यासर्व बाबी लक्षात घेऊन तसेच कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी अभिजीत देसाई, लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे संस्थापक विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे, श्रीकांत भोईर यांच्या मार्गदर्शनानुसार जयश्री फाऊंडेशननवी मुंबई संघटनेचे अध्यक्ष वैभव जाधव यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई महापालिकेत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त भेटवस्तू देण्यात आल्या.
यावेळी जयश्री फाऊंडेशननवी मुंबईचे संस्थापक वैभव जाधव, अभिजीत देसाई, विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे, श्रीकांत भोईर ,रोशनी पाटिल, निरज बोडके, स्वप्नील म्हात्रे,अनिशा पाचाळ, आर्यश्री मौरे,अक्षय कदम , अक्षय काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







