पनवेल वाहतूक शाखेतील वाहतूक पोलीस कर्मचारी व टोईंगव्हॅन कर्मचारी यांना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे दिवाळीनिमित्त भेट

raje-pratishthan navimumbai

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – पनवेल शहरामध्ये कोरोनामध्ये दिवस रात्र बंदोबस्त करून कोरोनाचा प्रादुर्भाव कसा टाळता येईल याकडे गांभीर्याने लक्ष देणारे वाहतूक पोलीस तसेच आता लॉकडाऊन संपल्यानंतर देखील कोरोनाचा प्रसार सुरु असताना आपल्या जीवाची पर्वा न करता भर गर्दीतील व जास्त लोकांचा संपर्क येणाऱ्या ठिकाणि बेशिस्तपणे व वाहतुकीला अडथळा करणाऱ्या नागरिकांच्या दूरचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचारी व टोईंगव्हॅनवरील कर्मचारी यांना श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांच्या आदेशाने व संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब तसेच महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, चिटणीस मंगेश लाड, सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून दिवाळी सणानिमित्त भेटवस्तू देण्यात आल्या.

 

 

यावेळी राजे प्रतिष्ठानचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, सचिव सुरेश भोईर, अंकुश माने, आनंद सुरते, कैलास रक्ताटे, ओमकार महाडिक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

raje-pratishthan

 

 

raje-pratishthan

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here