पुणे – बंगलूर महामार्गावर ट्रॅव्हलरच्या अपघातात पाच ठार

karad-accident

सातारा (प्रतिनिधी शरद मोरे) – पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज (ता.कराड) गावच्या येथील तारळी पूलाचा कठडा तोडून सुमारे चाळीस फूट ट्रॅव्हलर बस पडून झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

 

अपघातातील मृतांमध्ये एक महिला व तीन वर्षांच्या बालकाचा समावेश आहे. सदरचा अपघात पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. घटनास्थळी स्थानिक नागरिक व उंब्रज पोलिस यांचे तातडीने मदत कार्य सुरू होते. जखमींना उपचारासाठी सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त ट्रॅव्हलर वाशी वरून गोवा येथे निघाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here