मृतदेह घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्सचा भीषण अपघात, १३ गंभीर

ambulance-accident

सोलापूर (प्रतिनिधी) – पुण्याहून तेलंगणाच्या दिशेने मृतदेह घेऊन निघालेल्या ॲम्बुलन्सने धावत्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. हा अपघात शनिवारी पहाटे ३.४५ वा. सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ शहरात घडला. या अपघातात ॲम्बुलन्स चालकासह १३ जण गंभीर जखमी झाले असून त्यांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर सध्या सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तेलंगणा येथील एक कुटुंब नातेवाईकाचा मृतदेह घेऊन अॅबुलन्सने (एम.एच. १२. आर.एन. ६३८७) तेलंगणाच्या दिशेने निघाले होते. शनिवारी पहाटे ३.४५ वाजता त्यांची अॅबुलन्स मोहोळ शहरातील कन्या प्रशाला चौक येथे आली असता, सोलापूरच्या दिशेने निघालेल्या धावत्या ट्रकला (ट्रक क्र. एम.एच. ४३. बी.जी. ४५००) ॲम्बुलन्सची पाठीमागून जोरात धडक बसली. त्यामुळे भीषण अपघात होऊन ॲम्बुलन्स मधील १३ लोक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात ॲम्बुलन्सच्या कॅबिनचा अक्षरशः चक्काचुर झाला आहे.

 

 

अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वप्रथम जखमींना शासकीय रुग्णवाहिकेतून उपचारासाठी तात्काळ सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात पाठवून दिले. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असून जखमींची नावे समजू शकलेली नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here