26 नोव्हेंबर चा संप 100 टक्के यशस्वी करा – शिक्षक/ शिक्षकेत्तर संघटनेचे आवाहन

vardha-nivedan

वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – जूनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटीकरण रद्द करा, अन्यायकारक शेतकरी कायदे, कामगार कायदे रद्द करा, खाजगीकरण रद्द करा. तसेच इतर न्यायीक मागण्यांसाठी 26 नोव्हेंबर 2020 रोजी एक दिवसीय देशव्यापी संप राज्य मध्यवर्ती संघटनेने आयोजीत केलेला आहे.

 

या संपात वर्धा जिह्यातील सर्व घटक संघटना सहभागी होणार आहे. त्या अनुषंगाने संपाची रूपरेषा / नियोजन करण्यासाठी आज गुरुवार दि. 12 नोव्हेंबर 2020 ला नवदुर्गा कर्मचारी पतसंस्था, धंतोली चौक वर्धा येथे घटक संघटनांची पहिली सभा पार पडली. त्यात वर्धा जिल्ह्यात सर्व मिळून संप 100 टक्के यशस्वी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. कोरोनाचे सावट असल्यामुळे सर्वांनी प्रत्येक्ष रस्त्यावर न उतरता आपआपल्या कार्यालया बाहेरच संप करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. यावेळी मध्यवर्ती संघटनेचे वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष हरीश लोखंडे, सरचिटणीस व्ही. ए. भालतडक, हिवताप कर्मचारी संघटनेचे ए. के. बोटफोडे, कृषी संघटनेचे मनोहर दांडेकर, ए. एन. मून, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाह महेंद्र सालंकार, जूनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हा सचिव प्रमोद खोडे, देवळी तालुकाध्यक्ष रितेश निमसडे, वनविभाग संघटनेचे पी. बमनोटे, आर. जी.मुडे, लिपिक संघटनेचे अध्यक्ष एस. बि. देवगिरकर, संदीप ठाकरे, अजय भोयर उपस्थित होते.vardha-teacher

 

संपाबाबत पुढील नियोजनासाठी पुढील सभा रविवार दि. 22 नोव्हेंबर 2020 ला दुपारी 12.00 वाजता नवदुर्गा कर्मचारी पतसंथा, धंतोली चौक वर्धा येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी घटक संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा वर्धाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रमोद खोडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here