लासलगावचा कांदा कौन बनेगा करोडपतीमध्ये

kaun-banega-karodpati

नाशिक (प्रतिनिधी इंजि. कुबेर जाधव) – आशिया खंडातील अग्रेसर असलेल्या लासलगावचा कांदा बाजारपेठेतील कांद्याला मानांकन मिळाल्यानंतर आता कौन बनेगा करोडपती या ‘शो’ मध्ये अमिताभ बच्चन यांनी लासलगावच्या कांद्यावरील प्रश्न विचारल्याने कांद्याच्या माध्यमातून लासलगाव शहराला मानाचा शिरपेच मिळाला आहे.

 

 

कांद्याच्या भावामध्ये चढ उतार झालं की गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कांद्याची संपूर्ण देशभरात चर्चा होते. गुरुवार दि. १२ नोव्हेंबर रोजी कौन बनेगा करोडपतीच्या च्या१२ व्या सिझनमध्ये “लासलगाव का प्याज किस राज्य का है” यावर प्रश्न उपस्थित केला होता. कधी शेतकरी ते कधी ग्राहकांना रडविणारा कांद्याचा केबीसीमध्ये उल्लेख झाल्याने लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here