ज्येष्ठ कामगार नेते नागेशभाई सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार लहू कानडे यांच्याहस्ते अनाथ अश्रमातील मुलांना दिवाळी फराळाचे वाटप

shrirampur

श्रीरामपूर (प्रतिनिधी शौकतभाई शेख)- सर्वसामान्य व्यक्ती ही कोणत्याही कार्यात नेहमीच पुढे असते, मग ते राजकारण असो की समाजकारण असो, समाजासमोरील असलेले प्रश्न ते निर्भीडपणे मांडतात,जे सत्य आहे तेच बोलल्याने अनेकांची पंचायत होते,आमदार म्हणून मीही परखड बोलतो ते विकासाबाबत, मी आमदार असेपर्यंत श्रीरामपूर मतदारसंघातील प्रत्येक गावातील मतदारांच्या प्रश्नांची सोडवणूक करील नागरिकांनीही माझ्याकडे निर्भीडपणे विकास कामांबाबत प्रश्न मांडावेत असे आवाहान श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी केले, गोखलेवाडी परीसरातील श्रीसाई विठ्ठल अनाथ आश्रम येथे दिवाळी फराळ वाटपाप्रसंगी ते बोलत होते.

 

आश्रम चालकांनी शासनाची परवानगी घेवून शासनाचे अनाथ आश्रमासाठी असलेल्या सवलतीचा लाभ घ्यावा असेही ते याप्रसंगी म्हणाले, कामगार नेते नागेशभाई सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा स्वयंसेवक संघ. सिटीझन्स जस्टिस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र. छत्रपती राजे संभाजी चौक आदी संघटनांनी हा उपक्रम आयोजित केला होता.

 

याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते नागेशभाई सावंत,आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल,छत्रपती राजे संभाजी चौक संस्थापक अध्यक्ष राजेंद्र भोसले, वंचित बहुजन आघाडीचे चरण त्रिभुवन,बंटी आच्छडा,प्रकाश मेहत्रे, सुनील इंगळे,हरीष शिंदे,अमोल सावंत,सुरेश महसाळकर,सचिन झिंर्जुडे,बाल किर्तनकार कृष्णानंद महाराज, ज्ञानेश्वर महाराज आढाव,निकिता आढाव,भरत जाधव. राजू यादव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here