मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – दिवाळी पहाट कार्यक्रम आणि दिवाळीच्या फराळाचे समीकरण म्हणजे संगीत प्रेमी चोखंदळ रसिक प्रेक्षकां एक आनंददायी पर्वणी असते. महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा लाभलेल्या दिवाळी पहाटचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी निर्माता दिगंबर प्रभु ” रंगाई ” निर्मित ‘ रंगात रंगली दिवाळी ‘ विविध ठिकाणी नाटय गृहात रंगमंचावर सादर करतात. परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी पहाटचा कार्यक्रम संगीत प्रेमी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म वरून सुरेल गाण्यांची संगीत मैफल ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती.
खास दिवाळी निमित्त शब्द स्वरांनी मोहरलेल्या सुरेल सुमधुर मराठी गीतांचा नजराणा रसिकांसाठी सादर करण्यात आला . दिगंबर प्रभुद यांच्या संकल्पनेतून सुमधुर , सुरेल , अविस्मरणीय , लोकप्रिय मराठी गीतांची ‘ रंगात रंगली दिवाळी ‘ ही संगीत मैफल फेसबुक लाईव्ह वरून ऑनलाईन सादर करण्यात आली. निर्मिती प्रमुख गार्गी प्रभु यांच्या ” रंगात रंगली दिवाळी ” या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे संगीत संयोजन ” विनय चेऊलकर यांनी केले.” रंगात रंगली दिवाळी ” या आॅनलाईन संगीत मैफलीत गायक कलाकार धनश्री देशपांडे, माधुरी करमरकर, आणि धनंजय म्हसकर यांनी एका पेक्षा एक सरस मधुर मराठी गाणी सादर केली. लोकप्रिय मराठी गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली.
या ऑनलाइन कार्यक्रमाला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ‘ रंगात रंगली दिवाळी ‘ या आॅनलाईन संगीत मैफलीचे सुत्रसंचलन निवेदन निवेदिका स्मिता गवाणकर यांनी केले. विशेषतः सुप्रसिद्ध राशीचक्रकार शरद उपाध्ये आणि अभिनेते शरद पोंक्षे या मराठीतील दोन दिग्गजांशी निवेदिका स्मिता गवाणकर यांनी मारलेल्या गप्पांचा कार्यक्रम रंगतदार झाला. मुंबई ते परदेशवारी यंदाच्या रंगाई दिवाळी पहाटेची रंगत न्यारी असणारी संगीतमय डिजिटल मेजवानी निर्माता दिगंबर प्रभु यांनी भारतासह युरोप,युके, युएई, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया , युएसए , आणि कॅनडा येथील रसिकांना ऑनलाईन दिली.







