आसोदा येथील विद्यार्थ्यांनी साकारली प्रतापगडाची प्रतिकृती

asoda

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे किल्ले म्हणजे महाराष्ट्राचे वैभव. दिवाळीच्या सुट्ट्या लागताच आपल्या घरासमोर किल्ला बनविण्यासाठी चिमुकल्या शिलेदारांची लगबग सुरु झाली आहे.दिवाळीच्या खरेदीत चित्रे आणि किल्ला बनवण्याचे इतर साहीत्य देखील महत्त्वाचा घटक बनलेला दिसतोय.asoda-pratapgad

 

 

दिवाळी हा हिंदू धर्म संस्कृतीतला सर्वांत मोठा सण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौऱ्याची आणि त्यागाची दिवाळीतही आम्हाला आठवण राहावी, या उद्देशाने घरासमोर किल्लायांची प्रतिकृती बनवण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे.मुलांना दिवाळीची सुट्टी लागली की सणाच्या मुख्य खरेदीपेक्षाही किल्ला बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव आणि खरेदी करताना थोरामोठ्यांतही बालपण जागे होताना दिसते. दिवाळीच्या सुट्ट्या सुरु झाल्यानंतर तळेगाव दाभाडे सारख्या निमशहरी भागात लहान मुलांना खेळणे आणि खाण्यापिण्यापेक्षा किल्ले तयार करण्याची भारीच हौस दिसून येते आहे. साधारणतः दसऱ्यानंतर लाल माती गोळा करुन विटा दगडांचे डोंगर साकारले जातात.pratapgad-asoda

 

 

हीच परंपरा राखत असोदा येथील मयूर भोळे,रुपम भोळे, कार्तिक भोळे,इशांत भोळे,मनीष सोनार ,जयेश वाणी, देवेश वाणी , प्रसाद चौधरी या चिमुकल्यांनी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा प्रतापगड साकारलाय. त्यांनी साकारलेल्या या किल्ल्याचे जिल्हा परिषद सदस्य रविभाऊ देशमुख, ग्रामपंचायत सदस्य सुनिल पाटील यांनी तसेच असोदा येथील ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here