नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – युवकमित्र परिवार,पुणे यांच्या ‘गाव तेथे वाचनालय’उपक्रमातंर्गत वडाळी ता.शहादा येथे माळीवाडा परिसरात ‘माळी पंच मढी कार्यालयात’ स्वराज्य सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी युवकमित्र परिवाराचे प्रवीण महाजन यांनी वाचनालयास ११० पुस्तके प्रदान केली.वाचनालयाचे उदघाटन वडाळीचे प्रभारी सरपंच हिम्मत सोनवणे यांनी केले.प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील गजेंद्रगिर गोसावी,माजी सरपंच दीपक पाटील,आबा सोनवणे,म.फुले युवा मंचचे अध्यक्ष ईश्वर माळी,राकेश देवरे,पत्रकार राजेंद्र सोनवणे, संजय मिस्त्री,राजेंद्र झाल्टे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रीय बालदिननिमित्त ‘प.नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन पत्रकार सुनील माळी यांनी केले.उपस्थित सर्व मान्यवरांना पुस्तके भेट देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.यावेळी गावातील मान्यवरांनी वाचनालयासाठी आर्थिक देणगी जाहीर करत रोख स्वरूपातही वाचनालयास देणगी प्रदान केली.







