शाकाहार सदाचारचे प्रणेते सराफ व्यावसायिक रतनलाल बाफना यांचं निधन

ratanlal-bafana

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – जळगावात एक छोटेसे दुकान टाकून सुवर्ण व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवणारे बाफना यांनी विश्वास, सचोटी, पारदर्शकता या बळावर जळगावातील सोने देशभर पोहचविले. एका छोट्या दुकानापासून मोठ्या शोरूमपर्यंतचा प्रवास करणारे बाफना यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून शेकडोंना रोजगार उपलब्ध करून दिला. हळूहळू हा व्यवसाय औरंगाबाद, नाशिक अशा वेगवेगळ्या शहरात बाफना ज्वेलर्सच्या शाखा सुरू केल्या. या सोबतच जळगावनजीक गोशाळा सुरू करून मुक्या गुरांना आधार दिला.

 

बाफना यांनी व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक संकटात असलेल्यांना आधार दिला. तसेच अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करीत त्यांना आधार दिला. गोरक्षेच्या कार्यासह बाफना यांनी जैन धर्मियांच्या साधू संत, मुनी यांच्यासाठी निवासस्थान, धर्मशाळा सुरू केल्या.

 

बाफना यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. या परिवारासोबतच सुवर्ण पेढ्यांमधील कर्मचाऱ्यांचाही आधार हरविल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here