मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्रच्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुकाध्यक्षा सौ दीपा ताटे यांच्या संकल्पनेतून आणाव येथील संविता आश्रम येथे सदिच्छा भेट देण्यात आली .
यावेळी आश्रमातील महिला व पुरुष ,लहान मुले यांना दिवाळी निमित्त नवीन कपडे ,दिवाळी फराळ तसेच तेथील कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देवून त्यांच्या आनंदात दिवाळी सण साजरा करण्यात आला.यावेळी कुडाळ तालुका सचिव सौ तन्वी सावंत ,सदस्या सौ जान्हवी परब ,सौ रश्मी गावडे ,सौ मनीषा त्रिभुवणे , कु रुपाली वरक उपस्थित होत्या .
या कार्यक्रमासाठी कोकण विभाग अध्यक्षा तथा सुप्रसिध्द अभिनेत्री सौ अक्षता कांबळी तसेच सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा सौ ज्योतिका हरयाण यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले . कार्यक्रमाच्या शेवटी आश्रमाचे संस्थापक परब यांनी महिला उत्कर्ष समितीच्या सदस्यांचे व पदाधिकाऱ्यांचे त्यांच्यासोबत दिवाळी सण साजरा केल्याबद्दल आभार मानले.







