मुंबई (संपादक सुनिल पाटील) – तब्बल आठ महिन्यांनंतर राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिकस्थळं आजपासून खुली झाली आहेत. यामुळे राज्यभरातील भाविकांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. बहुतांश मंदिरं पहाटे चार ते पाचच्या सुमारास खुली करण्यात आली. कोरोनाचे नियम पाळूनच भाविकांना मंदिरात प्रवेश देऊन दर्शन दिलं जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला, भाविकांना दिवाळाचं भेट दिली. राज्यातील सर्व मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे सुरु करण्यास परवानगी दिली. सरकारच्या या निर्णयाचं सर्वांनीच स्वागत केलं आहे. कोरोनाव्हायरस आणि त्यानंतर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील मंदिरं मार्च महिन्यापासून बंद करण्यात आली होती.
ऑनलाईन ईपास घेण्यासाठीच्या लिंक
ऑनलाईन E-Pass साठी नोंदणी करण्यासाठी श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांव E-Pass नोंदणी – gajananmaharaj.org:8080, श्री साईबाबा संस्थान शिर्डी E-Pass नोंदणी – online.sai.org.in/, श्री विठ्ठल मंदीर पंढरपूर E-Pass नोंदणी – www.vitthalrukminimandir.org/home.html, श्री शनिमहाराज शनिशिंगणापूर E-Pass नोंदणी – www.shanidev.com, श्री सिद्धिविनायक दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग ॲपव्दारे करावं लागणार – play.google.com/store/apps/details?id=com.cynapto.ssvt. तरी सर्व भाविकांनी या ऑनलाईन ईपासचे बुकिंग केल्यानंतरच दर्शनासाठी यावे, असे आवाहन विविध देवस्थांनांतर्फे करण्यात आले आहे.
धुळ्यातील नृसिंह मंदिरात अन्नकुटचं आयोजन, भाविकांची गर्दी
इंद्र देवाचे गर्व हरण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर धरला अशी अख्यायिका आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजन निम्मित अन्नकुट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. धुळे शहरातील प्राचीन नृसिंह मंदिरात यानिम्मित विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शासनाने पाडव्यापासून मंदिर खुली करण्याची परवानगी दिल्यानं एक दिवस आगोदरच हे मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाच्या नियमांचं पालन करण्यात येत असल्याचा दावा मंदिराच्या पुजाऱ्यांनी केला. दर्शनासाठी तसेच अन्नकुटचा लाभ घेण्यासाठी मंदिराबाहेर भाविकांची रांग लागली होती. चातुर्मास निमित्त व्यर्ज केलेल्या फक्त शाकाहारी भाज्या, पदार्थांचा या दिवशी नैवेद्य दाखवला जातो, अशी माहिती पुजाऱ्यांनी दिली.







