राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओ.बी.सी सेल वाड॔ क्र. 85 च्या माध्यमातून महापालिकेतील कंत्राटी कर्मचारी व पोलिसांकरिता भाऊबीज निमित्त आगळावेगळा कार्यक्रम

ncp-obc

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – पोलिस बांधवाना व प्रभागातील नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी कोरोना विषाणू साथीचा आजार पार्श्वभूमीवर जीवाची पर्वा न करता व कुटूंबाची काळजी न करता काम केले आहे. कोरोना काळामध्ये पालिकेतील कर्मचाऱ्यांवर पोलिसांनवर प्रचंड ताण होता. यासर्व बाबी लक्षात घेऊन तसेच पोलिस बांधवाच्या व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी भावी नगरसेविका सौ. शालिनीताई अंकुश म्हात्रे यांच्या संकल्पनेतून पोलिस बांधवाना व प्रभागातील नवी मुंबई महापालिकेत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना भाऊबीज सणानिमित्त मिठाई देण्यात आल्या.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओ.बि.सी सेल महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर साहेब याच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव संघटक सलिम बेग व नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष योगेश गोरे, अंकुश म्हात्रे, अंबादास कळसे, श्रीकांत माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.ncp-1 ncp-police

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here