जिल्हा उपनिबंधकांनी नेमले चौकशीसाठी 5 अधिकारी. देवळा बाजार समितीचा बाजार उठणार – उदयकुमार आहेर

udyakumar-aaher

नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) – देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीतील कोट्यावधी रुपयांच्या विविध प्रकरणातील घोटाळ्यांची चौकशी करणेकामी विभागीय सह निबंधक नाशिक यांच्या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक, नाशिक यांनी एकूण 5 अधिकाऱ्यांची नेमणूक करून चौकशीचे आदेश दिले आहेत. तसे पत्र आज तक्रारदार म्हणून उदयकुमार आहेर यांना प्राप्त झाले आहे. सर्वच विषयांत 15 दिवसात अहवाल देण्याच्या सुचना चौकशी अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. सर्वच विषयांत मी दूध का दुध व पाणी… करणारच हा निर्धार त्यांनी याविषयी बुलंद पोलिस टाइम्सशी बोलतांना व्यक्त केला.

 

सर्वात मोठा घोटाळा असणाऱ्या या बाजार समितीचे गाळे परस्पर विक्री करण्याच्या विषयांत या आधीच्या चौकशी अधिकाऱ्यांनी बाजार समितीचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. पण, ती रक्कम नेमकी किती?, बाजार समितीचे गाळे बाजार समितीला परत मिळावेत तसेच दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी मी लावून धरणार आहे.अशी माहीती शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी दिली.

 

याविषयी बोलतांना ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या बाजार समितीत सुरू असलेले गैरप्रकार मी गेली अनेक वर्षे जीव धोक्यात घालून मांडत आहे. मात्र, देवळ्यातील पत्रकार महोदय त्यास प्रसिद्धी देत नाहीत. ते कोणालातरी घाबरतात असे मी म्हणणार नाही. मात्र, राज्याच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दिशा देणारी घटना देवळा तालुक्यात घडत असतांना त्या घटनेला प्रसिद्धी न देणे हे न उलगडणारे कोडेच आहे. पण, पत्रकारांच्या अश्या वागण्याने लोकांपर्यंत वस्तुस्थिती पोहोचत नाही. आणि आम्ही मॅनेज झालो अश्या अफवा विरोधक पसरवतात. याचाच अर्थ पत्रकार बांधवांच्या अश्या वागण्याने समाज प्रामाणिक लोकांवर देखिल संशय घेतो. एखाद्याचे करियर खराब होते. याची संपूर्ण जबाबदारी तालुक्यातील पत्रकारांची आहे. शेतकरी बांधवांच्या प्रामाणिकतेला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here