कोरोना काळात जालिंदर बोरुडे यांनी घेतलेले आरोग्य शिबीरे कौतुकास्पद – जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा

nagar

राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा रुग्णालयाच्यावतीने जालिंदर बोरुडे यांचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी वाजिद शेख) – फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांना नवी दिल्ली येथील महात्मा गांधी हेल्थ फाऊंडेशनचा राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा यांनी सत्कार केला. यावेळी डॉ. जगधने, डॉ. रामटेके, अतुल थोरात, गणेश कवडे, रतन तुपविहीरे, संजय गायकवाड, अनिल जाधव आदी उपस्थित होते.jalinder-borude

 

 


डॉ. जगधने यांनी जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून कोरोना काळात गरजू रुग्णांची गरज ओळखून मोठ्या धाडसाने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व विविध आरोग्य शिबीर घेतले. गरजूंना मोफत चष्मे व औषधांचे वाटप करण्यात आले. तर नागरिकांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती करुन त्याला प्रतिबंध करण्यासाठी आर्सेनिक गोळ्या, मास्क व सॅनीटायझरचे वाटप केले. तसेच वर्षभर गरजू घटकांसाठी ते आरोग्य शिबीर राबवीत असून, नेत्रदान व अवयवदान चळवळीत योगदान देत असल्याची माहिती दिली.

 

जालिंदर बोरुडे यांनी टाळेबंदीमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने अनेक रुग्ण विविध आजाराच्या उपचारापासून वंचित होते. गरजू रुग्णांची परवड होऊ नये, ही जाणीव ठेऊन फिनिक्सने नियमांचे पालन करुन कोरोना काळात विविध उपक्रम राबविल्याचे सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा यांनी फिनिक्सच्या माध्यमातून टाळेबंदी काळात जालिंदर बोरुडे यांनी घेतलेल्या आरोग्य शिबीराचे कौतुक करुन, फिनिक्सचे कार्य जवळून पाहिले असून, अवयवदान चळवळीत भरीव कार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here