शहादा (विजय पाटील) – आज नंदुरबार जिल्ह्यातील एका संशयिताचा मृत्यू झाला असून नंदुरबार जिल्ह्यात सध्या केवळ 45 रुग्णांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत कोरोना संसर्ग मुक्तचा आकडा 47 वर पोहोचल्याने नंदुरबार जिल्हा प्रशासनाला हे एक मोठे यश प्राप्त झाले असुन जिल्ह्यातील नागरिकांना एक दिलासादायक वृत्त आहे. नंदुरबार जिल्ह्यात याप्रमाणे कोरोनाच्या रुग्णात ही वाढ होतांना दिसत होती त्याचप्रमाणे कोरणा संसर्ग मुक्त होऊन घरी जाणाऱ्यांमध्ये देखील आज सर्वात मोठी वाढ झाल्याने चिंता कमी झाली आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले 24 रुग्णांमध्ये 17 रुग्ण हे नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील तर 7 रुग्ण हे शहरातील गिरीविहार कॉलनीतील होते तर 23 रुग्ण एकलव्य रेसिडेन्सी येथे कोरोनावर उपचार घेत होते. नंदुरबार शहरातील 8 रुग्ण सैताने येथील 8 रुग्ण तळोदा येथील 1 रुग्ण शहादा येथील 2 रुग्ण तर अमळनेर येथील 4 ररुग्णाचा समावेश आहे. एकलव्य रेसिडेन्सी येथील 23 रुग्णही कोरणा संसर्ग मुक्त झाले आहेत. त्यांना 14 दिवस होम कोरंटाईन करण्यात आले आहे..
नंदुरबार जिल्ह्यात आज 10 रुग्ण पॉझिटिव्ह त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात नंदुरबार शहरातील जिजाऊ नगर येथील 42 वर्षीय महिला तर 49 वर्षे पुरुष आहे तर नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयातील 34 वर्षे पुरूषाचा समावेश आहे असे एकूण 3 पॉझिटिव्ह रुग्ण हे नंदुरबार शहरातील तर तळोदा येथील दामोदर नगरातील 50 वर्षे पुरुष, शहादा तालुक्यातील तोरखेडा येथील सर्वात जास्त 6 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकाचा कोरोना संशयित म्हणून त्याचा मृत्यू झाला असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आलेला आहे तर नंदुरबार जिल्ह्यात तपासणीसाठी एकंदरीतच 2115 व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी घेतले होते त्यात 1780 व्यक्तींचे कोरणाचे अहवाल हे निगेटिव्ह प्राप्त झाले असून आज आज पर्यंत नंदुरबार जिल्ह्यात 190 व्यक्तींचा अहवाल हा पॉझिटिव प्राप्त झाला होता त्यात उपचारादरम्यान 9 व्यक्तींचा हा मृत्यू झालेला आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यात एकूण कोरूना संसर्ग मुक्त होऊन गेलेले 131 व्यक्ती असून सध्या नंदुरबार जिल्हा रुग्णालयात 45 व्यक्तींवर कोरोनावर उपचार सुरू आहे तर अद्याप 124 व्यक्तींचा कोरोणाचा अहवाल प्रलंबीत आहेत. तर नासिक येथे एकाचा उपचार सुरू आहे तर 3 व्यक्तिचा पुणे येथे उपचार सुरू आहे तर बडोदा येथे देखील एकाचा उपचार सुरू असल्याचं नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे. नंदुरबार शहरात आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्काभागात नंदुरबार नगरपालिकेकडून भागात निर्जंतुकीकरण करण्यात आले तर लगतच्या घरांमधील काही संपर्कातील व्यक्तींना होम कोरोंटाईन करण्यात आले आहे.







